पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे
बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती
बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडून
चार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय
पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे ‘सीट्रिपलआयटी’चा मार्ग खुला
मुंबई, दि. ३ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीन मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाने घेतला आहे.
या निर्णयामुळे बीड जिह्यातील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविणे, रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन होण्याचा मार्ग खुला झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण बैठका घेऊन ‘सीट्रिपलआयटी’च्या उभारणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. ‘एमआयडीसी’च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे केंद्रासंदर्भातील त्रिपक्षीय करार आणि प्रकल्पाचे भूमीपूजन लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नगरपरिषदेतर्फे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून ‘सीट्रिपलआयटी’ यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. रत्नागिरी येथे औद्योगिक क्षेत्रात ‘सीट्रिपलआयटी’ सुरु करण्यासाठी ‘एमआयडीसी’ला योजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी येथील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीने निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच धर्तीवर बीड येथील ‘सीट्रिपलआयटी’साठीही एमआयडीसीने निधी उपलब्ध करुन देण्याचा तसेच योजना अभिकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. एमआयडीसीचा हा निर्णय बीड जिल्ह्यातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
No comments:
Post a Comment