*८०वर्षांची जुनी भिंत!*
आपल्याकडे सुद्धा average आयुष्मान 80 च्या आसपास गेले आहे असे वाटते. त्यामुळे आता आपल्याला 80 वर्षे आनंदात जगायचे असल्यास काय करायला पाहिजे ते माहित करून घ्या. मानसोपचारतज्ज्ञ हिदेकी वाडा यांनी *८०-वर्ष-जुनी भिंत* नावाचे पुस्तक प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित होताच, त्याची विक्री ५,००,००० प्रतीं पेक्षा जास्त झाली, जी सध्या सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक ठरले. जर हाच दर कायम राहिला तर या पुस्तकाची विक्री १० लाख प्रतींपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे ते या वर्षी जपानमधील सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक बनेल.
या पुस्तकातील 60 ते 80 वर्षे वयाच्या लोकांना सुखी माणसं बनवण्याच्या 44 गोष्टी: 👇
1. *चालत राहा.*
2.चिडल्यावर खोल श्वास घ्या.
3.शरीर आखडत नसेल ,इतपत व्यायाम करा.
4.उन्हाळ्यात एसी वापरत असाल तर ,भरपूर पाणी प्या.
5."डायपर" वापरल्याने हालचाली सोप्या होतात.
6.जास्त वेळा चालल्याने शरीर आणि मेंदू अधिक ऊर्जावान राहतो.
7. *विसरणे हे वयामुळे नसून मेंदूचा दीर्घकाळ वापर न केल्यामुळे होते.*
8.जास्त औषधं घेण्याची गरज नाही.
9.रक्त दाब आणि साखर पातळी कृत्रिमरीत्या कमी करण्याची गरज नाही.
10.एकटे असणे म्हणजे एकाकीपणा नव्हे, तर आनंदी वेळ घालवणे.
11.आळशी असणे लाजिरवाणे नाही.
12.वृद्धांसाठी वाहन चालवणे धोका दायक ठरू शकते, त्यामुळे परवाना न घेण्याचा विचार करा.
13. *आवडते तेच करा, जे नकोसे वाटते ते करू नका.*
14.वय झालं तरीही सर्व नैसर्गिक इच्छा कायम राहतात.
15.घरात बसून राहू नका.
16.जे हवे ते खा, किंचित जाडसर राहणे ठीक आहे.
17.प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करा.
18.ज्यांना तुम्ही नकोसं समजता, अशा लोकांना टाळा.
19.सतत टीव्ही पाहू नका.
20. *रोगाशी अखेर पर्यंत लढण्यापेक्षा त्याच्या सोबत जगायला शिका.*
21."गाडी डोंगरावर गेली तरी वाट सापडते" हा जादूई मंत्र लक्षात ठेवा.
22.ताजे फळे आणि सॅलड खा.
23.आंघोळ 10 मिनिटांत पूर्ण करा.
24.झोप येत नसेल तर जबरदस्ती करू नका.
25.आनंदी गोष्टी केल्याने मेंदू सक्रिय राहतो.
26.मनातलं बोलून टाका, जास्त विचार करू नका,कसं बोलू वगैरे ?
27.लवकरात लवकर "फॅमिली डॉक्टर" ठरवा.
28.फार सहनशील राहू नका, थोडेसे "वाईट म्हातारे", व नट खट होण्यास हरकत नाही.
29.कधी कधी आपलं मत बदलायला व हट्ट सोडायला हरकत नाही.
30.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील "डिमेन्शिया" हा देवाने दिलेला आशीर्वाद आहे.
31. *शिकणं थांबलं की ,माणूस खरंच म्हातारा होतो.*
32.कीर्तीचा हव्यास सोडा, जे आहे ते पुरेसं आहे.
33.निरागसपणा हा वृद्धांचा विशेषाधिकार आहे.
34.जितक्या समस्या, तितकं आयुष्य रंजक!
35.सूर्यप्रकाशात बसल्याने आनंद मिळतो.
36. *दुसर्यांसाठी चांगल्या गोष्टी करा.*
37.आजचा दिवस निवांत जगा.
38.इच्छा हाच दीर्घायुष्याचा स्रोत आहे.
39.नेहमी सकारात्मक राहा.
40.मोकळा श्वास घ्या.
41.जीवनाचे नियम तुमच्या हातात आहेत.
42.प्रत्येक गोष्ट शांतपणे स्वीकारा.
43.आनंदी माणसं नेहमी प्रिय असतात.
44.हसण्याने नशीब उजळतं.
ही माहिती आपल्या सर्व ज्येष्ठ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा !
No comments:
Post a Comment