राज्यातील 24 महिलांची ओमान देशातून सुटका करण्यात आयोग यशस्वी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या की, शेकडो वर्षापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. आता समाजाची मानसिकता बदण्याची गरज आहे. गेल्या तीन वर्षात मानवी तस्करी संदर्भात काम करताना आयोगाने राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलीस दलाच्या ॲन्टी ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ओमानच्या देशदूताच्या सहकार्याने राज्यातील 24 मुली व महिलांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आले. भविष्यातही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी काम करण्यासाठी आयोग सज्ज आहे.
पहिल्या चर्चासत्रात मानवी तस्करीविरोधी लढ्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माँडेल्स, साधने, नवीन कल्पना आणि उपाय यावर चर्चा करण्यात आली. यामधे श्री ज्ञानेश्वर मुळये, माजी सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आय़ोग, स्टँक टेक्नोलाँजीचे संस्थापक श्री अतुल राय, प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर, सायबरपीस फाउँडेशनचे इरफान सिद्धावतम सहभागी झाले. मानवी तस्करी रोखण्यासाठी उपलब्ध कार्यपद्धती, तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सबाबत तज्ञ व्यक्ती यांनी जगभरातील अनुभव सांगितले.
प्रवासादरम्यान आणि ऑनलाइन माध्यमाद्वारे मानवी तस्करी विरोधात कृती आराखडा या दुसऱ्या सत्रात रेल्वे स्थानके, महामार्ग, बस स्थानके आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स यांसारख्या ऑनलाइन जागांवर तस्करी कशी ओळखायची आणि ती कशी थांबवायची यावर चर्चा झाली. यात परिवहन, रेल्वे, डिजिटल व्यासपीठ, स्वयंसेवी संस्था, कायदेशीर तज्ञ सद्यस्थिती, सुधारणा, समन्वय यावर त्यांनी विचार मांडण्यात आले.
सूत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शँराँन मेनेझेस यांनी केले.
No comments:
Post a Comment