Wednesday, 18 June 2025

Yराज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार

 राज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच 

सर्व कुलगुरुंची सामायिक बैठक होणार

 

मुंबई, दि. १८ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह  राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

विद्यापीठांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण लवकरच सर्व पारंपरिक विद्यापीठांची संयुक्त बैठक आयोजित करू तसेच राज्याच्या कृषिमंत्र्यांसह राज्यातील कृषी विद्यापीठांना भेट देऊन तेथील संशोधनाची विस्तृत माहिती घेऊ, असे राज्यपालांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर पदांवरील भरतीविद्यापीठांमधील वैधानिक पदांची भरतीउच्च व तंत्रशिक्षण विभागाची पहिल्या १०० दिवसांमधील उपलब्धीशिकाऊ उमेदवारी संलग्न पदवी अभ्यासक्रमकौशल्य विद्यापीठाशी सहकार्यराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीविद्यापीठांमधील प्रशासन सुधारसर्व पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता आदी विषयांवर चर्चा झाली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डीराज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरेउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरराज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती आदी उपस्थित होते.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi