सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या
राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
मुंबई, दि. २ :- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्रासी तत्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायसरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment