Tuesday, 17 June 2025

मुंबई हे शैक्षणिक आणि सर्जनशील केंद्र

 मुंबई हे शैक्षणिक आणि सर्जनशील केंद्र - बारेट

          यावेळी श्रीमती अ‍ॅलिसन बारेट म्हणाल्याकी. मुंबई ही केवळ आर्थिक नव्हे तर सर्जनशील उद्योगांची राजधानी आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक सहकार्याला विशेष महत्त्व आहे. युके सरकारच्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक धोरणात सर्जनशील क्षेत्राला अग्रक्रम आहे आणि भारतासोबत सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लंडनच्या इम्पीरिअल कॉलेजने नुकतीच बेंगळुरूमध्ये आपली शाखा उघडली आहे. पूर्वी शिक्षणासाठी देशाबाहेर गेलेले विद्यार्थी भारतात परत येत नसत. पण आता ही परिस्थिती बदलते आहे. ब्रेन ड्रेन’ ऐवजी आता ब्रेन सर्क्युलेशन’ घडत आहे, असे अ‍ॅलिसन बारेट यांनी स्पष्ट केले.

          भारतीय पारंपरिक ज्ञानस्टार्टअप संस्कृती आणि नवाचाराला परदेशी विद्यापीठे देखील आत्मसात करू लागली आहेत. युकेच्या अंदाजे ३०० आंतरराष्ट्रीय केंद्रांचा दाखला देत भारतातही अशा सहकार्याच्या अमर्याद शक्यता असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi