Saturday, 14 June 2025

वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग*,सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा*,प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा*

 वैशिष्ट्यांनी समृद्ध महामार्ग*

राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असेलला समृद्धी महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्यासह अनेक वैशिष्ट्यानींही  समृद्ध असा महामार्ग आहे. दळणवळणाची गतीमान घौडदौड साध्य करत पर्यंटनउद्योगशेतमालाला कमी वेळेत बाजारपेठेत पोहचवण्यास सहाय्यक ठरत असलेल्या समृद्धी महामार्गावरुन  आता पर्यंत अंदाजे दोन कोटी वाहनांनी प्रवास करत सुखदरहदारीमुक्त सुलभगतीमान  प्रवासाचा  अनुभव घेतला आहे.

*सर्वाधिक लांबी रुंदीचा बोगदा*

समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्यातील 76 कि.मी ची लांबी  ही  नाशिक व ठाणे या दोन  जिल्ह्यात येते. सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान पेलले. या टप्प्यामध्ये एकूण दुहेरी बोगदे असून या बोगद्यांची लांबी 10.73 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.46 कि.मी) आहे. त्यातील पॅकेज 14 (इगतपुरी) येथील बोगदा 8.00 कि.मी लांबीचा असून हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबी व रुंदीचा (17.61 मीटर) बोगदा आहे. या बोगद्याची उंची 9.12 मीटर आहे.

*प्रथमच बोगद्यात वापरण्यात येणारी  अग्निशमन यंत्रणा*

अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरीमधील सर्वात लांबीच्या बोगद्यामध्ये बसविण्यात आलेली आहे. या बोगद्यामुळे अंदाजे आठ मिनिटात इगतपुरी ते कसारा हे अंतर पार करता येणार आहे.   त्यातुन राष्ट्रीय महामार्ग क्र. नाशिक महामार्गावरील कसारा घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वाहतुक अधिक जलद होणार आहेकसारा घाटातील वाहतूक अधिक गतीमान होण्यासही  त्यामुळे सहाय्य होणार आहे.

* सर्वाधिक लांबीचा पूल*

भौगालिक परिस्थितीतून   मार्ग काढत महामार्गाचे काम पुढे नेत असताना नाशिक व ठाणे या जिल्ह्यातील  76 किमीच्या डोंगर दऱ्यामुळे व्हायाडक्ट (मोठे पूल) व बोगदे बांधणे हे मोठे जिकरीचे होते. काही ठिकाणी कठीण खडकात 30 ते 40 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या टप्प्यात एकूण 17 व्हायाडक्ट (मोठे व्हॅली पूल) असून त्याची  एकूण लांबी 10.56 कि.मी (दोन्ही मार्गिका मिळून एकूण लांबी 21.12 कि.मी) आहे.  या टप्प्यात सर्वाधिक लांबीचा पूल (व्हायाडक्ट) 2.28 कि.मी लांबीचा आहे. या टप्प्यात एका ठिकाणी (व्हायाडक्ट-2) पुलाच्या काही खाबांची उंची 84 मीटरपर्यत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi