Monday, 2 June 2025

विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

 विकसित कृषि संकल्प अभियाना’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातून अभियानाचा शुभारंभ

परभणीदि. 29 (जिमाका) : राष्ट्रव्यापी ‘विकसित कृषि संकल्प अभियाना’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे या अभियानाच्या चित्ररथाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटेसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छता,उर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरकृषिवित्तनियोजनमदत व पुनर्वसनविधी व न्यायकामगार राज्यमंत्री  अॅड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या संकल्पनेला गती देण्यासाठी आधुनिक कृषि पद्धतीसमृद्ध शेतकरी आणि विज्ञानाधिष्ठित शेती आवश्यक आहे. कृषि क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून अन्नसुरक्षेसोबतच देशाच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला रोजगार पुरवते. याकरिता केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात दि. 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अभियान यशस्वी होवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या माध्यमातून खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने लाभणार असून त्यांना शाश्वत उत्पादन घेता येईलअसे नमूद करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार संजय जाधवआमदार, कार्यकारी परिषद सदस्य सतीश चव्हाणआमदार व कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलआमदार रत्नाकर गुट्टेआमदार राजेश विटेकरप्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगीपुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडेकृषि आयुक्त सूरज मांढरे (भाप्रसे)‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. डॉ. इन्द्र मणि‘पिडीकेव्ही’ अकोला आणि ‘एमपीकेव्ही’ राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख‘बीएसकेकेव्ही’ दापोलीचे  कुलगुरू डॉ. संजय भावेजिल्हाधिकारी रघुनाथ गावडेपोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  नतिशा माथुरमनपा आयुक्त धैर्यशील जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून  शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिकसंशोधन संस्थांचे तज्ज्ञशासकीय विभागांचे अधिकारीनाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि 50 कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी  कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले असून याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.

*-*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi