मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे विद्यापीठ आणि अद्ययावत सुविधांनी सुसज्ज अशी वास्तू उभी राहिल्याचा उल्लेख करून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, चांगल्या अध्ययन सुविधांमुळे विद्यापीठाची गुणात्मक वाढ होईल. ज्ञानाचे अद्ययावतीकरण महत्त्वाचे असून त्याचे उत्तम उदाहरण या विद्यापीठाच्या माध्यमातून दिले जाईल अशी आशा आहे. ज्ञान ही मोठी शक्ती असून तिचे संपदेत रूपांतर करणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानासारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यापीठाने जागतिक पातळीवर अभिमानास्पद कामगिरी करावी, असेही ते म्हणाले.
मुख्य कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांनी नूतन इमारतीची पाहणी केली. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या इमारतीची भूमिपूजनही यावेळी सरन्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू विजेंदर कुमार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कुलसचिव रागिणी खुबाळकर यांनी आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment