भारतीय लष्कराच्या दक्षिण विभाग प्रमुखांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन संदर्भात चर्चा
मुंबई, दि. 23 : भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग – इन – चीफ, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, (पीव्हीएसएम) (एव्हीएसएम), यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट ॲपेक्स लेव्हल मिलिटरी-सिव्हिल फ्यूजन परस्पर संवादाच्या अनुषंगाने झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लष्कराचे दक्षिण विभाग प्रमुख यांच्यात नागरी संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि माजी सैनिकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या भेटीदरम्यान लष्कर आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव पी.अन्बलगन उपस्थित होते
No comments:
Post a Comment