Thursday, 19 June 2025

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी निधी चौधरी यांच्या चित्रांचे केले कौतुक

 कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी

निधी चौधरी यांच्या चित्रांचे केले कौतुक

 

          मुंबईदि. १९ : पर्यावरण संरक्षण या वैश्विक प्रश्नावर विविध प्रकारे जनजागृती होते. नॅशनल गॅलरी ऑफ आर्टच्या संचालक निधी चौधरी यांच्या बोलक्या चित्रातून पर्यावरण संवर्धनाचा केवळ संदेशच नाहीतर वास्तव चित्र उभे राहत असल्याचे कौशल्य, रोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत भरलेल्या निधी चौधरी यांच्या चित्र प्रदर्शनाला मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट देऊन त्यांच्या कलाकृतीचे  कौतुक केले.

          एकीकडे प्रशासकीय जबाबदारी आणि दुसरीकडे आपली कला जोपासत सनदी अधिकारी श्रीमती निधी चौधरी सामाजिक संदेश देण्याचे काम करत आहेत. जहांगीर आर्ट गॅलरीत येत्या २२ जूनपर्यंत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. प्रशासकीय अधिकारी निधी चौधरी यांनी चित्रांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जगात प्रचलित असलेल्या विविध कथांवर आधारित त्यांनी चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या एकूण ४० चित्रांचा या प्रदर्शनात समावेश असून यातील काही चित्रांमध्ये महापुरुषांच्या तत्त्वांचाही समर्पक वापर करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi