Monday, 23 June 2025

विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा -

 विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंदाज समित्यांची भूमिका खूप महत्त्वाची

          विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया  सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राक्कलन समितीचे ( अंदाज समिती) काम खूप परिणामकारक ठरतेसंसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

          उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीगरीब कल्याण हा  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अजेंडा असून प्रत्येक रुपया हा गरिबांपर्यंत पोहचलाच पाहिजे हे त्यांचे नेहमी सांगणे असते. अंदाज समित्या या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असतात. तसेच प्रशासनाची कार्यक्षमताअर्थकारण आणि पारदर्शकता सुनिश्चित करतात. सध्या या समित्यांचा अमृतकाल असून देशाचीही प्रगती दुप्पट गतीने होत आहे.

संसदीय समित्या म्हणजे छोटी संसद किंवा छोटी विधिमंडळे असतात. या समित्या म्हणजे लोकशाहीच्या आत्म्याचा आरसा आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  लोकशाही व्यवस्थेत आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकता हे अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ असून अंदाज समिती हे एक अत्यंत सक्षम आणि प्रभावी संसदीय माध्यम आहे. आपल्या अंदाजपत्रकात अनेक गोष्टी असतात. घोषणा आणि  तरतुदीही असतात. या तरतुदींचा योग्यठराविक वेळेत आणि प्रभावी वापर होतोय की नाहीहे पाहणे महत्त्वाचे ठरते आणि हीच जबाबदारी ही समिती पार पाडते असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या यशाचाही उल्लेख केला.

           मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरू करण्याआधी ‘आरबीआय’च्या सर्व मार्गदर्शक तत्वांचाअंदाजपत्रकातील तरतुदींचाएफआरबीएम कायद्याचा पूर्ण विचार करून पाऊल उचलले. जनतेच्या व्यापक हितासाठी अशा योजना अत्यावश्यक असतात. 

          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मागील ११ वर्षांच्या कार्यकाळात शासकीय कार्यात पारदर्शकतेचा आदर्श प्रस्थापित झाला आहे. त्यामुळे अंदाज समितीचे कार्य सुलभ झाले आहेअसे म्हटले तर वावगे ठरणार नाही.  एकीकडे आर्थिक पातळीवर सावध आणि कुशल राहून शिस्तीचे पालन करावे लागते तरदुसरीकडे जनतेने निवडून दिलेल्या सरकारने जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणेही महत्त्वाचे असते. शेवटी लोकशाहीतील सरकार हे जनतेसाठीच असते असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi