अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्या हस्ते
'आपलं मंत्रालय' या गृहपत्रिकेच्या अंकाचे प्रकाशन
मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मे २०२५ या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव सुचिता महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव (मावज) समृद्धी अनगोळकर, अवर सचिव (मावज) अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.
'आपलं मंत्रालय' गृहपत्रिकेच्या अंकामध्ये मंत्रालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लिहिलेल्या कथा, कविता, ललित लेख, सुलेखन मालिका, स्वानुभव, पाककला, भ्रमंती, तंत्रज्ञानाची टेकवारी, मिशन आयगॉट कर्मयोगी, वेव्हज, या विषयीचे लेख समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
आपलं मंत्रालय वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा :
https://www.flipbookpdf.net/
https://acrobat.adobe.com/id/
00000
No comments:
Post a Comment