Monday, 23 June 2025

अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंदाज समितीचे योगदान महत्वाचे

 अंतिम घटकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी  

अंदाज समितीचे योगदान महत्वाचे

- मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस

अंदाज समिती ही केवळ आर्थिक परीक्षण करणारी संस्था नाहीतर ती अंतिम माणसाच्या आशा - आकांक्षा पूर्ण  करणारी प्रभावी यंत्रणा आहे लोकशाहीत या अंदाज समितीचे योगदान महत्वाचे असल्याचे    प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेप्राक्कलन" हा शब्द संस्कृतमधून आलेला असून पूर्वीची गणना’ म्हणजेच अंदाज होय. सरकारचे अंदाजपत्रक सादर होतेतेव्हा त्यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया असते. विभागांना निधी देताना त्यांच्या योग्य विनीयोगावर अंकुश ठेवणारी यंत्रणा असणारी  अंदाज समिती अत्यंत प्रभावी भूमिका बजावते.  ही समिती केवळ शिफारसी करत नाहीतर ती सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्यासही भाग पाडते. महाराष्ट्रात अंदाज समितीच्या सुमारे 65 ते 70 टक्के पेक्षा अधिक शिफारसींची अंमलबजावणी होतेही  अत्यंत सकारात्मक बाब आहे.

          प्रशासनावर नैतिक दबाव निर्माण करून शिस्तजबाबदारी आणि पारदर्शकतेचा संस्कार घडवणाऱ्या समितीमुळे अचूक कामकाजाबाबत प्रशासनाला जाणीव राहतेअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेअंदाज समितीमुळे लोकशाही व्यवस्था सक्षम होते. प्रशासनातील कार्यपद्धती तपासणेधोरणांचे मूल्यांकन करणे आणि अर्थसंकल्पातील तरतुदी प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचतात काहे पाहणे या समितीच्या माध्यमातून शक्य होते. समित्या सरकारवर अंकुश ठेवणारे माध्यम आहे. अधिवेशनाच्या बाहेरही या समित्या बाराही महिने काम करत असतात. यामुळे प्रशासन अधिक गतिमान होते.

          या अमृतकाळात आपण सर्वांनी मिळून या समितीला अधिक सक्षमप्रभावी आणि परिणामकारक कसे करता येईलयावर विचार केला पाहिजे.  भविष्यातील पुढील  पिढ्यांसाठी आदर्श मानके निर्माण करण्याचे हे सुवर्णसंधीचे वर्ष आहेअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi