प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, योग हा पतंजली आणि गौतम बुद्धांनी या मातीत रुजवला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगात नेला. पुणे शहरातील १८७ महाविद्यालये, प्राचार्य, सुमारे १ हजार २०० प्राध्यापक आणि ६ हजार विद्यार्थी या योग दिनात सहभागी झाले होते. प्रशासन, शासन आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला सामाजिक आशय लाभला आहे.
यावेळी योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने उपस्थित सर्वांकडून योगाभ्यास करवून घेतला. ताडासन, भुजंगासन, अर्धशलभासन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विनोम आदी आसने व प्राणायाम करण्यात आले.
योग कार्यक्रमात आमदार सर्वश्री भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे आदी सहभागी झाले. परदेशी नागरिक, विद्यापीठातील अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यार्थी आदी योगात सहभागी झाले. यावेळी जागतिक संगीत दिनानिमित्त अभंग गायन करण्यात आले.
No comments:
Post a Comment