Tuesday, 17 June 2025

खासदार परिचय पुस्तिका’चे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रकाशन

 खासदार परिचय पुस्तिकाचे केंद्रीय आयुष राज्यमंत्री

प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रकाशन

 

नवी दिल्ली, दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्र निर्मित खासदार परिचय पुस्तिकाचे प्रकाशन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष भवन येथे करण्यात आले. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोराकेंद्रीय मंत्री यांचे अपर खासगी सचिव राहुल साळुंखे उपस्थित होते.

या प्रकाशन प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणालेमहाराष्ट्र परिचय केंद्राने अतिशय उपयुक्त आणि जनसामान्यांसाठी प्रभावी असा उपक्रम हाती घेतला आहे. लोकप्रतिनिधींची माहिती एकाच ठिकाणी मिळणं ही काळाची गरज असूनही पुस्तिका माहितीच्या पारदर्शकतेस हातभार लावेल. अशा उपक्रमांमुळे जनसंपर्क अधिक प्रभावी होत असून शासनाच्या प्रयत्नांना दिशा मिळते.

या पुस्तिकेत महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभा  खासदारांची तपशीलवार माहिती समाविष्ट करण्यात आली असूनत्यामध्ये खासदारांचे नावजन्मतारीखनवी दिल्ली  व मतदार संघातील निवासी पत्तासंपर्क क्रमांकई-मेल पत्तास्वीय सहायकांचे संपर्क क्रमांक तसेच सोशल मीडिया हँडल्स यांचा समावेश आहे. ही माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देत जनता आणि लोकप्रतिनिधी  यांच्यातील संवाद अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा उद्देश या उपक्रमाने साध्य होत आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राने यापूर्वीही अनेक उपयुक्त उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. दिल्ली डिरेक्टरीसह 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करण्यात आलेली लोकसभा पूर्वपीठिका’ ही पुस्तिका याच केंद्राची कल्पकता आणि गुणवत्ता अधोरेखित करणारी ठरली होती. त्या यशाची परंपरा खासदार परिचय पुस्तिका ’ ने ही समर्थपणे पुढे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी उपसंचालक श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल रामेश्वर बर्डेसहायक ग्रंथपाल निलेश देशमुख आणि दीपक देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.

ही पुस्तिका शासकीय विभागमाध्यम प्रतिनिधीसंशोधक आणि जनतेसाठी एक विश्वासार्ह संदर्भस्रोत म्हणून कार्य करणार असूनमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उदाहरण ठरेल.

0000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi