Saturday, 14 June 2025

आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस

 आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी

एनडीआरएफएसडीआरएफ पथके सतर्क

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस

मुंबई,दि. १४ : अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून   एनडीआरएफएसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी,  मुंबई शहर २५.४पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती  राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात कालपासून आज १४ जून २०२५  रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ३.४,रायगड २०रत्नागिरी ४५,  सिंधुदुर्ग ७०.८,  पालघर ०.२नाशिक १०.५धुळे २.२नंदुरबार ४.६जळगाव ४.८अहिल्यानगर ५.५पुणे २३.८सोलापूर ५.९,  सातारा ८.८,  सांगली २.६,  कोल्हापूर ७छत्रपती संभाजीनगर १६.७जालना ७.८बीड ७.६लातूर २,  धाराशिव ९.५नांदेड ०.६,  परभणी ०.७,  हिंगोली ०.८बुलढाणा २.७अकोला ३वाशिम १.८अमरावती ०.६यवतमाळ ०.८नागपूर २.४भंडारा ३.४गोंदिया १.१चंद्रपूर ०.४ आणि 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi