Saturday, 28 June 2025

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक

 एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसीप्रक्रिया बंधनकारक

 

मुंबई,दि.23:महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना 'केवायसी'  प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती एमपीएससीने दिली आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसारउमेदवारांना पुढील चारपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागणार आहे: 1. आधार ऑनलाइन ई-केवायसी, 2. आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, 3. आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, 4. नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करता येणार आहे.

 अर्ज करण्याआधीच ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल. याशिवायएकदाच नोंदणी करताना उमेदवाराने आपला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी प्रणालीत नोंदवणेही आवश्यक आहे. जर उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडलीतर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. संदर्भानेएमपीएससीने मार्च 2017 पासून ऑनलाइन प्रणालीत आधार क्रमांक नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

ही प्रणाली लागू केल्यामुळे उमेदवारांची ओळख अचूकरीत्या प्रमाणिकरण करता येणार असूनफसवणूक आणि चुकीच्या माहितीला आळा बसेल. विशेष म्हणजेविशिष्ट ओळख प्राधिकरण आणि राज्य शासनाने एमपीएससीला अधिकृत मान्यता दिली असूनआता भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi