Friday, 20 June 2025

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना

 रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

 

मुंबई, दि. २० : रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहेअसे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. 

लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित 'व्हाय आर वी इन द आरएसएस?.... ' या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झालेत्यावेळी ते बोलत होते. 

पूर्वी संघासाठी कार्य करणाऱ्यांना शासनात पदे स्वीकारता येत नसतअसे सांगून आज देशाचे पंतप्रधानअनेक राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

देशात भूकंपनैसर्गिक आपदा व रेल्वे अपघात होतात त्यावेळी संघाचे स्वयंसेवक नेहमीच सेवा कार्यात अग्रेसर असतातअसे राज्यपालांनी सांगितले.

उत्तर पूर्वेच्या  राज्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी भावनेने जोडण्याचे काम रा.स्व. संघ करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना रमेश पतंगे यांचे संघावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी लेखक पतंगे तसेच अनुवादक डॉ अश्विन रांजणीकर यांचे अभिनंदन केले. 

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पुस्तकातील निवडक उतारे वाचून दाखवले तर 'आम्ही संघात का आहोत ...या श्री.पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ. अश्विन रांजणीकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील पूर्वी संघ प्रचारक होते.  

रा. स्व. संघ आपल्या स्वयंसेवकांना भारत मातेच्या गौरवासाठी काम करण्यास सांगतोया कारणास्तव आपण आयुष्यभर संघासाठी कार्य केलेअसे रमेश पतंगे यांनी सांगितले. पुस्तकाचे भाषांतर सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये होणार असल्याची माहिती श्री. पतंगे यांनी यावेळी दिली. 

रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'साप्ताहिक विवेक'तर्फे प्रकाशित या पुस्तकाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi