Saturday, 21 June 2025

मंत्रालयात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 मंत्रालयात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

 

मुंबईदि. 20 : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. इन्स्टिट्युट ऑफ योगा यांच्या सहयोगाने आयोजित या प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी कौशल्यरोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाराज्यमंत्री पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकइन्स्टिट्युट ऑफ योगाचे सह संचालक ऋषी योगेश यांच्यासह विविध विभागांचे सचिवउपसचिवअधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते.

            यावेळी इन्स्टिट्युट ऑफ योगाच्या मार्गदर्शकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच योगाच्या महत्त्वाविषयी माहिती दिली. यावेळी पर्वतासनशवासन यासारख्या योगांची प्रत्यक्षिके उपस्थितांनी केली. तसेच अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक विजेते मंत्रालयीन अधिकारी जगन्नाथ लांडगेदत्ताराम सावंत आणि योगिता जाधव यांनी योग प्रात्यक्षिके सादर केलीत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi