Friday, 20 June 2025

नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी 1070, 09321587143 , 022-22027990, 022-22794229 हे राज्य हेल्पलाइन क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. तसेच 1077 हा हेल्पलाइन,pl share

 आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्जआपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित

- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

आपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित

शासनप्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा

 

मुंबईदि. १८ :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्यानाले  भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहेतअशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा ( विदर्भतापीकोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल नुकताच कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे नागरिकांनी  पर्यटन स्थळे  व धोकादायक ठिकाणी अधिक सतर्क राहावेअसे  आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी केले आहे.  तसेच अतिवृष्टीवीज पडणेदरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर  तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी  1070, 09321587143 , 022-22027990,  022-22794229 हे राज्य  हेल्पलाइन क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. तसेच 1077 हा  हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi