Tuesday, 6 May 2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन

युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती

 

अहिल्यानगरदि. ६ : जिल्ह्यातील चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिपरिषद बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत दाखल झाले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सदस्यांसह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसराला भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदेजलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलहोळकर घराण्याचे १६ वे वंशज युवराज यशवंतराव होळकरपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे आदींसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि त्याच परिसरात असलेल्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

 

स्मारक परिसरात सुरू असलेले गढीचे नूतनीकरणनक्षत्र उद्यानसंरक्षक भिंतशिल्प,  संग्रहालयशिवसृष्टी या प्रगतीपथावरील कामांची पाहणी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे निवासस्वयंपाकघरदेवघरओसरीतुळशी वृंदावनबैठकीचे ठिकाणधान्य साठविण्याचे ठिकाणदरबार या स्थळांची पाहणीही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केली. सभापती प्रा. शिंदे यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

 

ढोलताशांच्या गजरात स्वागत

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सहकाऱ्यांचे अहिल्यादेवी स्मारक परिसरात आगमन होताच धनगरी ढोल पथकाने ढोल गजर केला. सुवासिनिंनी सर्व मंत्र्यांचे औक्षण केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi