Monday, 19 May 2025

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी

वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

 

मुंबई, दि. १५ : ग्रामपंचायतजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जातीजमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यासत्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी  समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ही वैधता प्रमाणपत्रे सादर  करण्यासाठी अजून बारा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून या बाबतचा अध्यादेश राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या द्वारा ( महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि.३० एप्रिल २०२५ )  निर्गमित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जातीजमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यासत्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी  समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा  उमेदवारांनी वेळेवर अर्ज करूनसुद्धापडताळणी समितीकडे कामाचे ओझे अधिक असल्यामुळे प्रमाणपत्र मिळायला वेळ लागतो. त्यामुळे अनेक निवडून आलेल्या सदस्यांना वेळेत वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि ते अपात्र (निरर्ह) ठरवले जातात. ही अडचण लक्षात घेऊन,  महाराष्ट्र (ग्रामपंचायतजिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणूकांकरिता ) वैधता प्रमाणपत्र सादर  करण्याची  मुदत तात्पुरती वाढविणे अधिनियम २०२३ (२०२३ चा महा.३५)  याद्वारे  १२ महिन्यांकरता मुदतवाढ देण्यात आली होती.

 तरीदेखील अजूनही अकरा हजारांपेक्षा अधिक सदस्यांचे अर्ज समितीकडे प्रलंबित आहेतआणि फक्त पडताळणी समितीने वेळेत प्रमाणपत्र न दिल्यामुळे त्यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अन्यायकारक आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात अडथळा निर्माण करते. त्यामुळेअशा सदस्यांना आणखी १२ महिने मुदत द्यावी जेणेकरून ते आपले वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतील. तसेच केवळ  जात  पडताळणी  समिती कडून वेळेत वैधता प्रमाणपत्रे देण्यात न आल्याच्या कारणावरुन अशी पदे धारण करण्यापासून वंचित केले जाणार नाही याची सुनिश्चिती करणे आवश्यक असल्याने हा अध्यादेश निर्गमित करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi