Saturday, 3 May 2025

वेव्हेज २०२५' आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ

 'वेव्हेज २०२५आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून

भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ

सांस्कृतिक कार्य  मंत्री ॲड. आशिष शेलार

·         वेव्हज-२०२५  समिटमध्ये स्पॉटीफाय यांच्यावतीने

साऊंडस ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

 

मुंबईदि. २ :-  वेव्हेज २०२५या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक समृद्धीला जागतिक व्यासपीठ मिळत आहे. 'वेव्हेज २०२५'  ही केवळ एक परिषद नाही तर भारतीय सर्जनशीलतेचा आणि सांस्कृतिक एकात्मतेचा उत्सव असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य  मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५  समिटमध्ये दुसऱ्या दिवशी  स्पॉटीफाय यांच्यावतीने सदर करण्यात आलेल्या साऊंडस ऑफ इंडिया या सांस्कृतिक कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्य  मंत्री श्री. शेलार म्हणाले हा सांस्कृतिक कार्यक्रम भारताची पारंपरिक संगीतशैली आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधणारा आहे.  मनोरंजन क्षेत्रातील नवप्रतिभांना प्रोत्साहन देणेसांस्कृतिक वारसा जपणे आणि जागतिक स्तरावर भारताच्या सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मुंबई केवळ आर्थिक नव्हे तर सांस्कृतिक राजधानी असल्याचे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. शेलार म्हणालेया शहरात निर्माण होणाऱ्या कलाकृतींनी जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक शंतनु मोईत्रा आणि त्यांच्या चमूने भारतातील विविध भागामधील शेतातील पेरणी आणि कापणी संदर्भातील लोकगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

या संस्कृतिक कार्यक्रमात पारंपरिक वाद्यआधुनिक साउंड आणि सांस्कृतिक विविधतेच्या अद्वितीय मिलाफामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी सोनटक्के यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi