Friday, 2 May 2025

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन सोहळा साजरा

 महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन सोहळा साजरा

 

        मुंबईदि.1 : महाराष्ट्र राज्य 66 व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा साजरा झाला.

            यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य प्राप्त झालेल्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन केले.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले कीमहाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे. राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या  गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रध्दाजंली अर्पण केली.

ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळेसचिव डॉ.विलास आठवलेसचिव शिवदर्शन साठ्येसह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवीसह सचिव नागनाथ थिटेउप सचिव सुभाष नलावडे  यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

                         

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi