Thursday, 1 May 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन,

महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट

 


मुंबईदि. १ : वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनमहाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

 यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारआदी उपस्थित होते.

    भारत पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाच्या 'मॅजिकल महाराष्ट्रया पॅव्हेलियनलाही प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी भेट दिली. यावेळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध पॅव्हेलियनला भेट देत करमणूक आणि दृकश्राव्य माध्यमांमधील नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात माहिती त्यांनी जाणून घेतली. तर गेमिंग आर्केडला भेट दिल्यानंतर त्यांनी गेमिंग क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध संधी याविषयी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रासह हरियाणापंजाबराजस्थानमध्यप्रदेशआंध्र प्रदेशतेलंगणा  राज्यांसह या क्षेत्रातील नेटफ्लिक्सजिओयू ट्यूबतसेच विविध मानोरंजन आणि वृत्त वाहिन्याचित्रपट निर्मिती संस्था यांनी त्यांचे पॅव्हेलियन उभारले आहेत.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi