मीडिया आणि विकास क्षेत्रात आघाडी - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन
भारत प्राचीन कला आणि आधुनिकतेला एकत्र आणत आहे, म्हणूनच जागतिक माध्यमे आणि विकास क्षेत्रात आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भारत नैसर्गिक पर्याय ठरत आहे. वेव्हजच्या माध्यमातून आपण मनोरंजनासह देशाच्या संस्कृतीच्या संवर्धनाची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाली. त्यांच्या वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. नागालँड येथील कलाकारांनी नागालँडची लोककला सादर केली.
पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांच्या 'अप्सरा आली' या गाण्याला तर पॉप संगीत गायक अलन वाल्कर यांच्या पॉप संगीताला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण
एम एम किरामणी यांनी संगीत दिलेल्या आणि ए आर रहमान, शंकर महादेवन, प्रसन्न जोशी, रॉकी केज, मित ब्रदर यांनी गायलेल्या वेव्हज ऑफ इंडिया अल्बमचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
0000
No comments:
Post a Comment