Thursday, 22 May 2025

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील बी.एल.ए. साठी निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण कार्यक्रम

 तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील बी.एल.ए. साठी

निवडणूक आयोगाकडून प्रशिक्षण कार्यक्रम

 

मुंबई, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) तामिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील बूथ लेव्हल एजंट्स (BLA) साठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयआयडीईएमयेथे दोन दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात ११ राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांतील एकूण २२९ बी.एल.ए. (BLA-I आणि BLA-II) सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम इंग्रजी आणि तामिळ भाषेत पार पडला.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी बी.एल.ए. यांना संबोधित करताना त्यांची निवडणूक प्रक्रियेमधील महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. त्यांनी सांगितले कीप्रतिनिधित्व अधिनियम १९५० व १९५१मतदार नोंदणी नियम १९६० आणि निवडणूक संचालन नियम १९६१ तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना यानुसार बी.एल.ए. यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे.

हा आयआयआयडीईएम येथे घेण्यात आलेला दुसरा बी.एल.ए. प्रशिक्षण कार्यक्रम आहे. याआधी बिहारमधील बी.एल.ए.-साठी १६-१७ एप्रिल २०२५ रोजी प्रथम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणादरम्यान सहभागींना त्यांची नियुक्तीजबाबदाऱ्या आणि कायदेशीर अधिकार यांचा सविस्तर परिचय करून देण्यात आला. मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्याच्या प्रक्रियेत बी.एल.ए. महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच प्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम २४(अ) आणि २४(ब) अंतर्गत अपील करण्याच्या तरतुदींविषयीही त्यांना माहिती देण्यात आली.

दरम्याननिवडणूक आयोगाने राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या अध्यक्षांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत आयोगाने ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन केले असूनत्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३,८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांच्या माध्यमातून २८,००० हून अधिक राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले आहेतअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi