Wednesday, 28 May 2025

मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर

 मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर

महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर झालेले आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन दि. २५ मे रोजी झालेले असून मुंबई मध्ये दि. २६ मे रोजी दाखल झालेला आहे. दरवर्षी मान्सूनचे आगमन ११ जून ला होत असते. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देताना अरबी समुद्रावर कमी दाबाचा २२ मे रोजी निर्माण झाला होता. त्याचे परिवर्तन पुढील दोन तीन दिवसात चक्रीवादळात होण्याची शक्यता होती. परंतु सदरचे परिवर्तन कमी दाबाचा पट्टा तयार होऊन  त्याचा परिणाम हा रत्नागिरीच्या ४० कि.मी. उत्तरेला आणि दापोलीच्या दक्षिणेला झाला.  यामुळे २४ ते २७ मे दरम्यान रेड अलर्ट असलेल्या रत्नागिरीसिंधुदुर्गसातारा घाटकोल्हापूर घाटठाणेपुणेरायगडसातारामुंबईचंद्रपूर व गडचिरोली याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामतीदौंडइंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अतिवृष्टी झाली. तसेच ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हतील रायगडपुणे घाटलातूरनांदेडचंद्रपूरगडचिरोली ठाणेसातारारत्नागिरीसिंधुदुर्गअहिल्यानगरसांगलीसोलापूरबीडलातूरधाराशीव अनेक ठिकाणी पूरस्थिती व अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi