शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी अधिक गतीने काम करावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाक आहेत दोघांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.नागरिकांना मंत्रालयात यावे लागू नये यासाठी स्थानिक पातळीवरच आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, ही शासनाची भूमिका आहे,जनतेला शासनाच्या विविध सेवा व सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, प्रशासनाला गती मिळावी,यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. या उद्दिष्टपूर्तीमध्ये अनेक विभागीय धोरणे, लोकाभिमुख योजना आखण्यात आल्या आणि अनेक विभागांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या विभागाच्या कार्याचा गौरव करण्यात आला असू प्रेरणादायक हे कार्य आहे. याआधी 'शासन आपल्या दारी' यासारखे उपक्रम राबविले गेले. जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. शंभर दिवसांचा आराखडा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 150 दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला."
No comments:
Post a Comment