Tuesday, 20 May 2025

भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

 भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’

पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

 

मुंबई१९ : भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंड राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील अग्रभागी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय क्षमता-विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केले. प्रशिक्षणात झारखंडमधून आलेले ४०२ सहभागी अधिकारी सहभागी झाले असूनयामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), मतदार नोंदणी अधिकारी (ERO), BLO आणि पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. मागील तीन महिन्यांत IIIDEM तर्फे देशभरातील ३००० पेक्षा अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त श्री.कुमार यांनी मतदार नोंदणीसाठी झारखंडमधील अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेमध्ये मतदार यादी संदर्भातील प्रथम व द्वितीय अपील प्रक्रिया (आरपी कायदा १९५० च्या कलम २४(अ) आणि २४(ब)) बाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

            जानेवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या विशेष सारांश पुनरावलोकनानंतर झारखंडमधून कोणतीही अपील प्राप्त झाले नाही.

या प्रशिक्षणात सहभागी अधिकारी मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रिया संदर्भातील आणि कायदे लोकप्रतिनिधि कायदा १९५०१९५१मतदार नोंदणी नियम १९६०निवडणूक नियम १९६१ यांचे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये फॉर्म ६७ व ८ भरण्याचे प्रत्यक्ष सरावघरोघरी सर्वेक्षणाचे अनुकरणआणि Voter Helpline App व इतर आयटी साधनांचा वापर यांचा समावेश आहे.

याशिवायसहभागी अधिकाऱ्यांना EVM आणि VVPAT यंत्रांची तांत्रिक माहितीतसेच मॉक पोल्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहेअशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi