नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास तत्वतः मान्यता
‘नवीन नागपूर’ या दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पास या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिली. हा प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) यांचाद्वारे संकल्पित करण्यात आला आहे. एनएमआरडीएच्या हद्दीत हे शहर होणार असून यात स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या व आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनेल प्रणाली ही या शहरातील मुख्य वैशिष्ट्य असेल. प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कूलिंग, स्वयंचलित कचरा व्यवस्थापन, वीज, पाणी, वायू व टेलिकॉम यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे पुरवेल. खोदकामविरहित व भविष्यातील गरजांना अनुकूल असे शहर साकारले जाईल. या प्रकल्पामुळे आयटी, वित्त व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून, एकात्मिक पायाभूत सुविधा, गुंतवणूक सुलभता व मजबूत प्रशासन मॉडेल यांच्या जोरावर हे शहर नागपूरच्या आर्थिक महत्त्वाला नव्याने परिभाषित करेल, अशी माहिती एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी यावेळी दिली.
या बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.गोविंदराज, गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बळगन, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त संजय मीना, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजत चौधरी, नागपूर जिल्हाधिकारी बिपीन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment