Saturday, 17 May 2025

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी समिती गठीत करावी

 बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी समिती गठीत करावी

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई दि. 14 : राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगारसेवाशर्तीचे नियमन करणेत्यांची सुरक्षाआरोग्य व कल्याणासाठी राज्यशासन सातत्याने उपाययोजना राबवित आहे. त्याअनुषंगानेच जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी व्हावी व त्यांना योजनेचे सर्व लाभ मिळावेत ही बाब विचारात घेवून तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात यावीअसे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांच्या नोंदणीनूतणीकरणलाभाचे अर्ज करतांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकरआमदार आशिष देशमुखमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव श्री. कुंभारउपसचिव दीपक पोकळेमहसूल उपसचिव धारुरकर आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेराज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांना न्याय देता यावा तसेच शासनाच्या सर्व योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेता यावायासाठी जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. याकरिता संजय गांधी निधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ज्याप्रमाणे तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुकास्तरावर, ग्राम पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधीग्रामसेवकसरपंच आणि इतर महत्वाच्या व्यक्तींचा समावेश करून समिती स्थापन करण्याबाबत सविस्तर अभ्यास करून तसा अहवाल सादर करण्यात यावा. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या नोंदणीनूतनीकरण करणे आणि लाभाचे वाटप करण्यासाठीची प्रक्रिया ही आधार ओटीपीशी लिंक करण्यात यावीअसे निर्देशही यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi