Wednesday, 7 May 2025

महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश ,pl share

 महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल

मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरसह संवेदनशील ठिकाणांचा समावेश

 

नवी दिल्ली, 6 : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16  ठिकाणांचा यात समावेश असूनबुधवार दि. 7 मे रोजी एकाचवेळी या मॉक ड्रिल्स केले जाणार आहे.

 

देशातील 259 शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सर्तकता बाळगावीतसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावीयासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

महाराष्ट्रातील 16  ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी

पहिला गट : अति संवेदनशील ठिकाणांचा असूनयामध्ये मुंबईउरण व तारापुर या तीन ठिकाणांचा समावेश आहे.

दुसरा गट : ठाणेपुणेनाशिकरोहा-धाटाव-नागोठाणेमनमाडसिन्नरथळ वायशेतपिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.

तिसरा गट : छत्रपती संभाजीनगरभुसावळरायगडरत्नागिरीसिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे.

 

या ठिकाणी बुधवारी दि. 7 मे रोजी मॉकड्रिल घेण्यात येणार असूननागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणेहा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi