Wednesday, 30 April 2025

TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल"

 TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल"

            मुंबई, दि. 29 : सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने "TECH वारी - टेक लर्निंग वीक" या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वस्तरांवरील कर्मचाऱ्यांना डिजिटल युगासाठी आवश्यक ज्ञानसाधने आणि विचारसरणीने सज्ज करणारा हा उपक्रम आहे. ५ ते ९ मे२०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे TECH-वारी हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. हा प्रशिक्षण उपक्रम महाराष्ट्राच्या प्रशासनात होणाऱ्या डिजिटल परिवर्तनातील आघाडीचा ठरणार आहे. वारी या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या संकल्पनेवर आधारित TECH-वारी ही समर्पण व सामूहिक प्रगतीचे प्रतीक आहेजे शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निरंतर शिक्षण व सहयोगाची भावना जागृत करते. या सामूहिक प्रवासाचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासनाकरीता सक्षम करणे हा आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण

                  TECH-वारीचा गाभा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सहजसोपे आणि समजण्याजोगे बनवणे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेनइंटरनेट ऑफ थिंग्ज् (IoT), सायबर सुरक्षाडिजिटल फायनान्स अशा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारे हे जटिल विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले जातील. प्रशासन सक्षमीकरण, सेवा प्रदान व नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे सांगितले जाईल. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर मानसिक व भावनिक आरोग्यही महत्त्वाचे आहे, सर्वांगीण आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी TECH-वारीमध्ये तणाव व्यवस्थापन, संगीत थेरपीध्यानधारणा, कार्य-जीवन समतोल या विषयांवर विशेष सत्रे आयोजित केली आहेत. यामुळे एक संतुलित व सुदृढ शासकीय कर्मचारी वर्ग घडवण्यास मदत होईल.

प्रसिद्ध वक्त्यांचा अपूर्व मेळा

            या कार्यशाळेत सुप्रसिद्ध वक्त्यांचा समावेश असून 'प्रभावी व तणावमुक्त जीवनया विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्रभु गौर गोपालदास यांचे ५ मे २०२५ रोजी व्याख्यान होणार आहे. 'प्रवास पाककृतीचा'या विषयावर ६ मे २०२५ रोजी सुप्रसिद्ध शेफ माधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.'आरोग्यपूर्ण जीवनशैलीया विषयावर रूजता दिवेकर यांचे ७ मे रोजी तर,'जीवन संगीतया विषयावर डॉ.संतोष बोराडे यांचे ८ मे रोजी २०२५ रोजीध्यान आणि अंतरिक शांती या विषयावर व्याख्यान होणार आहेत.

प्रशासनातील तंत्रज्ञान परिवर्तक

              'तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचे परिवर्तनया विषयावर सचिव (MeitY) श्री. एस. कृष्णन,'कृत्रिम बुद्धिमत्ता'या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी एआय इंडिया मिशन चे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांचे,'विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक'या विषयावर निती आयोगाच्या फेलो देबजानी घोष यांचे, 'भाषा अडथळे दूर करणारे तंत्रज्ञान'या विषयावर डिजिटल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील प्रशासनाचे अधिकारी

              'महसूल विभागात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर'या विषयावर महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांचे, 'स्टार्टअप डेमो डे - महा-राईज प्लॅटफॉर्म'या विषयावर कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, 'आपत्ती निवारण व पुनर्वसनात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर'या विषयावर नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, 'कुंभमेळ्यात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांचे, 'नागरी क्षेत्रात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा वापर' या विषयावर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांचे, 'वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापरया विषयावर कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi