Saturday, 26 April 2025

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

 मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने

विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

 

मुंबई दि. 25 :  मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हैंडबॉलबास्केटबॉलवुशूपॉवरलिफ्टिंगवेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे:

बास्केटबॉल: जिकेपी बास्केटबॉल कोर्टआचार्य अत्रे मैदानपंतनगरघाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.००

हँडबॉल: विभागीय क्रीडा संकुलचिकूवाडीमुंबई पब्लिक स्कूलसमोरसायंकाळी ४ ते ६

फुटबॉल: होली पब्लिक स्कूलअंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६

पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग: फिटनेस पॉईंट जिमभांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६

वुशू: श्री नारायण गुरु हायस्कूलचेंबूर व एस.आय.इ.एस.घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३०

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकरभक्ती आंब्रेक्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे – ८२०८३७२०३४श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi