Saturday, 19 April 2025

लघु सिंचन योजनासह,जलसाठ्यांच्या प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे

 लघु सिंचन योजनासह,जलसाठ्यांच्या

प्रगणनेचे काम यंत्रणांनी समन्वयाने करावे

-जिल्हाधिकारी आंचल गोयल

 

मुंबईदि 15 :- लघु सिंचन योजनांची व जलसाठ्यांचे प्रगणनेचे काम विहित  वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअशा सूचना मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिल्या.

 

लघु पाटबंधारे योजनांची सातवी प्रगणना व जलसाठ्यांची प्रगणना कामांबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस ठाणे जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी तथा  समन्वय समितीचे सदस्य सचिव फरीद खानउपसचिव सुशील महाजन यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

 

जल व्यवस्थापनामध्ये जलसाठ्यांच्या प्रगणनेला अधिक महत्व असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्याप्रगणनेद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे भविष्यातील नवीन लघु सिंचन योजनांसाठी  व पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी सुयोग्य नियोजन करणे शक्य होणार आहे. लघुसिंचन योजनेची सातवी प्रगणनाजलसाठ्यांची दुसरी प्रगणना आणि मोठ्या व मध्यम प्रकल्पाची पहिली प्रगणना मुंबई शहर जिल्ह्यासाठी प्रथमच होत आहे. जलसाठ्यांच्या प्रगणनेचे हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. प्रगणनेच्या कामासाठी प्रगणक व परीक्षकांची नियुक्ती करून त्यांना पुढील आठवड्यात याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्यानंतर त्वरित प्रगणेनेच्या कामास सुरुवात करावीअशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी दिल्या.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi