Thursday, 10 April 2025

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा

  

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील

कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा

महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

 

मुंबईदि. ०९ : कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवरहाटी जमिनी या शासनाच्या जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.

या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असूनत्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तथापिया जमिनींवर विकासकामे करण्यासाठी वन (संरक्षण) अधिनियम१९८० अंतर्गत वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. परिणामीविविध मूलभूत सुविधा व धार्मिक-सामाजिक कामांचे प्रस्ताव रखडलेले आहेत. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तातडीने या जमिनीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावाअशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी दिल्या.

 रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील प्रलंबित कामांचा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा मंत्रालयात घेण्यात आला.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले कीया जमिनींच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या १२ डिसेंबर १९९६ च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचा संदर्भ घेतदेवरहाटी जमिनीवर विकासकामांसाठी पुढील कार्यवाही निश्चित करावी. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये पारंपरिक मंदिरेसभागृहअंगणवाड्याशाळास्वच्छतागृहे यांसारखी अनेक मूलभूत कामे वन परवानगी अभावी रखडलेली आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीग्रामपंचायती व प्रशासनाकडून या कामांसाठी वेळोवेळी प्रस्ताव प्राप्त झाले असूनत्यावर जलद गतीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणालेदेवरहाटी जमिनीच्या विकासाचा प्रश्न संवेदनशील असला तरी न्यायालयीन निर्णयकायदेशीर बाबी व स्थानिक जनतेच्या भावना यांचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल.

बैठकीस दूर संवाद प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीरत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंगसिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटीलविभागीय वन अधिकारी चिपळूणउपवन संरक्षक सावंतवाडीतर मंत्रालयात महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi