Tuesday, 22 April 2025

शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र

 शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

श्रीमती पवार यांनी मानले मुख्यमंत्र्यांसहराज्य शासनाचे आभार

 

मुंबईदि. २२ : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश आज मंत्रालयात प्रदान केले.

 

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सतत सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे व राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद पोलीस यांच्या पत्नीस थेट पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश दिल्याने त्यांची शहीदांप्रति असलेली संवेदनशीलता दिसून आली आहेअशी भावना श्रीमती पवार यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानत व्यक्त केली.

 

श्रीमती पवार म्हणाल्या, 'माझ्या पती प्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी मिळाली. हे शासन शेतकऱ्यांचेकष्टकऱ्यांचेलाडक्या बहिणींचे आणि  देशाच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान दिलेल्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.'

०००००

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi