Thursday, 24 April 2025

सागरी महामंडळाने होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे

 सागरी महामंडळाने होर्डिंग उभारणी व जाहिरातीबाबत

सर्वसमावेशक धोरण तयार करावे

-  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. 23 : सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणीत्यावरील जाहिरातबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

            मंत्रालयात सागरी महामंडळाच्या जागांच्या व्यावसायिक वापराविषयी धोरण ठरवण्यासाठी बैठक  आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपप्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

            सागरी महामंडळांच्या मुंबई महानगर  क्षेत्रातील जागांवर होर्डिंग उभारण्यासाठी धोरण राबवताना त्यातून जास्तीत जास्त महसूल निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत असे सांगून मंत्री राणे म्हणाले कीहोर्डिंगच्या माध्यमातून किमान 100 कोटी महसूल निर्मितीचे उद्दीष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धात्मकता निर्माण करावी. खुल्या निविदा मागवाव्यात. महामंडळाने स्वतः होर्डिंग उभारावीत व त्यावरील जाहिरातीचे हक्क विक्री करावे. महसूल वाढीसाठी मदत होईल. याशिवाय महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर होतो त्याचेही नियमन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व जागा भाडेपट्ट्याने देताना स्पर्धात्मकता आणण्याच्या दृष्टीने निविदा मागवण्याची कार्यवाही करावी. अनेक वर्ष एकाच जागी व्यवसाय केला जातो.  पणनियमानुसार भाडे अदा केले जात नाही अशा प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावंर कारवाई करावीअशा सूचनाही मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi