पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार
- गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर
मुंबई, दि. २० : पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत तातडीने चौकशी करण्यात येईल. हे अनधिकृत बांधकाम असल्यास तातडीने निर्देश देऊन काढण्यात येईल,असे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
थेरगाव येथील अनधिकृत बांधकामाबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
गृह राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, थेरगाव येथील हा भाग पुणे महापालिकेत येतो. पुणे महापालिकेला कारवाईबाबतचे निर्देश देण्यात येतील. या अनधिकृत बांधकामामुळे या भागात होत असलेल्या बेकायदेशीर वर्तन आणि गैरव्यवहारांवरही कारवाई करण्यात येईल, संगमनेर येथील घटनेची माहिती घेऊन याबाबतही आवश्यक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment