Wednesday, 2 April 2025

भारत नेट टप्पा दोन प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्तम संपर्क यंत्रणा निर्माण करावी

 भारत नेट टप्पा दोन प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये

उत्तम संपर्क यंत्रणा निर्माण करावी

- केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटीवाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १ : देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारत नेट टप्पा एकमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे. आता टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातही उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावीअसे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. मुंबईतील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्तांबाबत नगरविकास विभागबृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्याच्या सूचना देत समितीने चार आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देशही केंद्रिय मंत्री सिंधिया यांनी दिले.

 

सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबईतील बीएसएनएलच्या मालमत्ता आणि महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सैनिककेंद्रीय दूरसंचार सचिव नीरजकुमारबीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रावी आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय दळणवळण मंत्री सिंधिया म्हणालेभारत नेट टप्पा दोन अंतर्गत फोर जी नेटवर्कचे देशभरात एक लाख टॉवर उभारण्यात येणार आहे. हे टॉवर प्रामुख्याने संपर्क नसलेल्या भागात उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण होईल. ग्रामीण भागात सांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi