!!*सेवा आणि अहंकार* !! श्री स्वामी समर्थ!!
*रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभु श्री रामचंद्रांच्या सैन्यासाठी लागणारी रसद अन्नसामग्रीतले पीठ एकदा संपले होते. श्री राम हनुमंताला* म्हणाले *चित्रकूट पर्वतावर* जा तिथे तुला *अन्नपुर्णामाता दळण दळत* असल्याचा आवाज येईल. तीच्या कडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. *हनुमंतांनी श्री रामाना* विचारले, "पण *अन्नपुर्णामाता* मला कशी काय ओळखणार ?"
*श्री राम म्हणाले,* "ओळख म्हणून ही माझी *अंगठी* तीला दे" आणि त्यांनी स्वतःची *अंगठी हनुमंतांना* दिली.
*हनुमंत* पर्वतावर पोहोचले, त्यांच्या मनात विचार आला मी जर पीठ नेले नाही तर *श्री रामांच्या सैन्याची* काय अवस्था होईल, शेवटी माझ्या शिवाय *प्रभु श्री रामचंद्रांचे* कोणतेही काम होणे अशक्यच. *हनुमंताना अहंकाराने* ग्रासले.
एका मोठ्या गुहेतून *जात्यावर दळण्याचा* आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी *दगडाची शिळा* होती. त्या गुहेसमोर जाऊन *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* हाक मारली, म्हणाले *"माते मी प्रभु श्री रामचंद्रांचा सेवक हनुमंत, मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ* आणण्यासाठी पाठविले आहे. गुहेतून *अन्नपुर्णामातेचा* आवाज आला, *"हे हनु ! गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये".*
*हनुमंत* आपल्या शेपटीने *शिळा* बाजूला करू लागले, *शिळा* काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी *शिळा* बाजुला करायला लागले तरी शिळा काही तसूभरही हलली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनीशी जोर लावून *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न करू लागले, घामाघूम झाले, काही केल्या *शिळा* बाजुला काही सरकत नव्हती. *हनुमंतांच्या* मनात विचार आला मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही. शेवटी *हार* मानून *हनुमंत* म्हणाले, "माते, ही *गुहेवरची शिळा* काही मला बाजूला करता येत नाही."
*अन्नपुर्णामातेने* विचारले, *"हनु , तू अहंकार केलास का?"* तर *हनुमंत* म्हणाले, "होय माते !
"मला आता त्याचा *पश्र्चाताप* होतो आहे."
*अन्नपुर्णामाता* म्हणाली,
*"तुला पश्र्चाताप होतो आहे ना?* मग आता पुन्हा एकदा *शिळा* बाजुला करायचा प्रयत्न कर."
*अन्नपुर्णामातेने* सांगितल्याप्रमाणे *हनुमंतांनी* शिळा बाजुला करायचा प्रयत्न केला, तर काय शिळा अलगद बाजूला सरकली. गुहेमध्ये आत गेल्यावर *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला प्रभु श्री रामचंद्रांनी* दिलेली अंगठी दाखवली, *अन्नपुर्णामाता* म्हणाली, "त्या पलीकडे तो कोपरा आहे ना तीथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा".
*हनुमंत* अंगठी ठेवायला गेले, पहातात तर काय तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून *हनुमंतांनी अन्नपुर्णामातेला* विचारले "माते, हा इथे अंगठी मुद्रांचा खच कसा काय ?"
*अन्नपुर्णामाता* म्हणाली, "अरे हनु , प्रभुंनी तुझ्यासारखे कित्येक *हनुमंत* कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठविले तेव्हापासूनच्या आहेत त्या मुद्रा अंगठ्या"
हे ऐकल्यावर मात्र *हनुमंतांचा गर्व* पुर्णपणे नाहीसा झाला.
*सद्गुरूंची* सेवा करताना कुठल्या गोष्टीचा *अहंकार* नसावा.*मी* करतो म्हणून सेवा होते, हा भ्रम आहे.परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणा न कोणाची निवड करतो.आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलंच असतं व ते कोणा न कोणाच्या हातून घडतचं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकार युक्त,*दिखावटी* केलेली सगळी सेवा व्यर्थ आहे.
*💫!!श्री गुरूदेव दत्त!!✨*!! श्री स्वामी समर्थ!!
🙏🏻🌹
No comments:
Post a Comment