Wednesday, 9 April 2025

पत्रकारांचे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण काम

 पत्रकारांचे आयुष्य सुकर करण्यासाठी शासनाचे सातत्यपूर्ण काम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन पुरकार वितरण सोहळा

 

मुंबईदि. ८ : पत्रकारांना बातम्या मिळविताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पहिली बातमी आपली असावीया स्पर्धेमुळे पत्रकारांची बातमी मिळविण्याची धडपड अनेकवेळा निदर्शनास येते. पत्रकार कुटुंबासाठी वेळ न देता आपल्या करिअरला वाहून घेत आपल्या कर्तव्याला न्याय देतात. पत्रकारांचे हे धडपडणारे आयुष्य सुकर करण्यासाठी शासन सातत्यपूर्ण काम करीत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

अण्णाभाऊ साठे सभागृहात टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंतगृह राज्यमंत्री योगेश कदमआमदार प्रसाद लाडअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेटिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधवमहासचिव पंकज दळवीखजिनदार प्रवीण पाटील आदि उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपत्रकारिता क्षेत्रामध्ये महिला पत्रकारांचे विशेषत्वाने कौतुक करावेसे वाटते. बातमी मिळविताना त्यांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. बऱ्याच ठिकाणी कुठलेही मूलभूत सुविधा नसतानाही महिला पत्रकार आपले काम अचूकतेने बजावीत असतात. पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असून पत्रकारांना सोबत घेऊन ते सोडवण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल. 

 

टीव्ही जन्मालिस्ट असोसिएशनचा हा पहिलाच पुरस्कार सोहळा असल्याचे सांगत या सोहळ्याला उपस्थित राहता आलेयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या पुरस्कारा सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देण्यात आले. पत्रकारिता क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल हा त्यांचा गौरव होता. पुरस्कार हा आपल्या क्षेत्रातील कामाचे मूल्यमापन असते. त्यामुळे असोसिएशनने सुरू केलेले पुरस्कार कौतुकास्पद आहेअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकारकॅमेरामॅनवृत्त निवेदकग्रामीण भागातील पत्रकारकॅमेरामॅनजीवनगौरव पुरस्कार आदींचे वितरण करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi