Friday, 4 April 2025

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला

 ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे

भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईदि. ४ : मेरे देश की धरतीए वतन ए वतन हम को तेरी कसमअशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झालीअसे ज्येष्ठ निर्मातेपटकथाकारदिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे 'भारतकुमारयांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे कीआपल्या अभिनय कारकिर्दीत शहीदपुरब और पश्चिमहिमालय की गोद मैहरियाली और रास्तारोटी कपडा और मकानक्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्तीशेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली.  मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.

भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

००००


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi