Friday, 4 April 2025

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

 १६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

 

मुंबई, दि. ४ :- सोळावा वित्त आयोग येत्या ८ व ९ मे २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  १६  व्या वित्त आयोगाच्या दौ-याच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे  आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री  अजित पवारवित्त राज्यमंत्री आशिष जयस्वालमुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीराज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लरसदस्य एस. चंद्रशेखरवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्तानियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवराउपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्तावित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय वित्त विभागाच्या सचिव ए.शैलायांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 या दोन दिवसीय दौऱ्यासंदर्भात वित्त विभागाद्वारे करण्यात येत असेलल्या तयारीबाबत अपर मुख्य सचिव श्री.गुप्ता यांनी सविस्तर सादरीकरण केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi