Wednesday, 16 April 2025

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

 तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठीत

 

मुंबईदि. 16 : राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे.  

या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फड मालककलाकारवादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊनपारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतीलअशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.

तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असूनतमाशा फड मालक रघुवीर खेडकरतमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधवकलाकार मंगलाताई बनसोडेकलाकार अतांबर तात्या शिरढोणकरअभ्यासक गणेश चंदनशिवेअभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील. 

कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असूनकलाकेंद्र मालक बाळासाहेब काळेकलाकेंद्र मालक अभिजित काळेकलाकार रेश्मा परितेकरकलाकार सुरेखा पुणेकरकलाकार प्रमिला लोदगेकरकलाकार संघटनेचे धोंडीराम जावळेअभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील.

या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असूनआवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासककलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi