Wednesday, 26 March 2025

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन २८ मार्च २०२५ पर्यंत siac1915@gmail.com या ईमेलवर अर्ज, सविस्तर अर्ज प्रपत्र (डीएएफ) आणि रहिवासी प्रमाणपत्र पाठवावे

 राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था येथे

निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. २५ :  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी ) वतीने घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा (आय.एफ.एस) मुख्य परीक्षा-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थामुंबई येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या अभिरुपी मुलाखत कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी ) वतीने घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा (आय.एफ.एस) मुख्य परीक्षा-२०२४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थामुंबई येथे निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचे सत्र २ एप्रिल २०२५ पासून सुरु  होत असून राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या अभिरुपी मुलाखत कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी २८ मार्च २०२५ पर्यंत siac1915@gmail.com या ईमेलवर अर्जसविस्तर अर्ज प्रपत्र (डीएएफ) आणि रहिवासी प्रमाणपत्र पाठवावे. तसेच मुलाखत कार्यक्रम नोंदणीकरिता www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनेचे अवलोकन करावे. याचबरोबर विद्यार्थ्यांनी  अधिक माहितीसाठी ०२२-२२०७०९४२ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावाअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi