Sunday, 2 March 2025

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एमटीडीसीकडून महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत,pl share

 आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एमटीडीसीकडून

महिला पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबईदि. २८ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (MTDC) आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी  १ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबविण्यात येणार आहेत. "आई" महिला केंद्रित/लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले कीएमटीडीसीने महिलांसाठी समर्पित  'आईहे महिला केंद्रित पर्यटन धोरण अंमलात आणले आहे. महिला पर्यटकांसाठी प्रवास अधिक सुरक्षितसोयीस्कर आणि संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. २०२४ मध्ये एमटीडीसीच्या  महिला दिन विशेष सवलतीला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. १५०० हून अधिक महिला पर्यटकांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळे सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर२०२५ मध्येही ही योजना राबवण्यात येणार आहे.महिला पर्यटक www.mtdc.co या संकेतस्थळावर जाऊन सवलतीचा लाभ घेऊ शकतात.  

राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले कीपर्यटन क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महिला पर्यटकांसाठी हा  विशेष उपक्रम आहे  एमटीडीसीची नागपूरछत्रपती संभाजीनगर आणि खारघर (नवी मुंबई) येथील महिला-संचालित पर्यटक निवास  पूर्णतः महिलांद्वारे संचलित केली जातात. यामध्ये रिसॉर्ट व्यवस्थापनसुरक्षाटॅक्सी सेवास्वच्छताहॉटेलिंग आदी सर्व जबाबदाऱ्या महिलांकडेच आहेत. यामुळे महिलांना पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi