Sunday, 2 March 2025

हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी,pl share

 हत्तीरोग मुक्त महाराष्ट्रासाठी

औषधोपचार मोहिमेला सहकार्य करावे

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २५ : हत्तीरोग दूरिकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम राज्यातील ५ जिल्ह्यांत १० फेब्रुवारीपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणाऱ्या औषधोपचारांचा लाभ घेऊन हत्तीरोगापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

 

आरोग्यभवन येथे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची आढावा बैठक झाली. बैठकीस डॉ. नितीन अंबाडेकरसंचालकडॉ. बबिता कमलापूरकरसहसंचालकआरोग्य सेवा (हिवताप हत्तीरोग व जलजन्य रोग)डॉ. प्रेमचंद कांबळे सहायक संचालक तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेहत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा संबंधित रुग्णांनी लाभ घ्यावा. घरीकार्यालयात किंवा शाळेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत देण्यात येणारी औषधे सेवन करावी. त्यामुळे निश्चितपणे आपण हत्तीरोगावर मात करू शकता. आरोग्य विभागाला सर्वांनी सहकार्य करून हत्तीरोगापासून आपला बचाव करावाअसेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

 

राज्यातील पालघरनांदेडगडचिरोलीभंडारा व चंद्रपुर या ५ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारीपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण ५४ लाख ९८ हजार ८८४ लोकसंख्या असूनत्यापैकी ५१ लाख ५८ हजार १७० पात्र लाभार्थ्यांना औषध देण्याचे विभागाचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेंतर्गत उपचारासाठी डीईसीअल्बेंडाझोल आणि आयवरमेक्टिन या औषधी गोळ्या देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने या आजाराचे २०२७ पर्यंत आपल्या देशातून दूरीकरण करण्याचे ध्येय ठेवले आहे. मागील काळात राज्‍यातील १८ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांतून हत्‍तीरोगाचे दूरीकरण करण्‍यात यश आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi